8 Don 75 Movie : ‘८ दोन ७५’मधील ‘एन्जॉय एन्जॉय’ गाणं प्रदर्शित

0
Enjoy Enjoy Song

नगर : २०२३ या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.आता असाच एक चित्रपट म्हणजे ‘८ दोन ७५ :फक्त इच्छाशक्ती हवी’ (8 Don 75 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील नवं गाणं एन्जॉय एन्जॉय’ (Enjoy Enjoy Song) प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नक्की वाचा : तलाठी भरतीचा निकाल ‘या’ महिन्यात लागणार  

आता ‘एन्जॉय एन्जॉय’या गाण्याद्वारे तुम्ही नव्या वर्षाच्या स्वागत करू शकणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता शुभंकर तावडे (Actor Shubhankar Tawde) आणि अभिनेत्री प्रियंका जाधव (Actress priyanka Jadhav) हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यावर आधारीत हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘एन्जॉय एन्जॉय’ हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देत आहे. गणेश निगडे यांनी हे गाणे लिहिलं आहे. या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं आपल्या सुंदर आवाजामध्ये गायलं आहे.

अवश्य वाचा : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ‘८ दोन ७५ या चित्रपटाची निर्माती केली आहे. तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी पार पाडली आहे. या चित्रपटामध्ये शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी यांसारखी स्टारकास्ट एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here