AMC | नगर : अहिल्यानगर महापालिकेची (AMC) आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असताना आयुक्तांच्या दालनावर लाखोंचा खर्च केला जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. हे बांधकाम करताना कोणते नियम आखले गेले की नियमबाह्य पद्धतीने झाले असा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
नितीन भुतारे म्हणाले… (AMC)
नितीन भुतारे म्हणाले, महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचा विषय गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. वास्तविक पाहता महापालिकेने कोणतीच अधिकृत परवानगी न घेता त्यांनी थेट कामस सुरुवात केले असल्याचा आरोप भुतारे यांनी केला आहे. वास्तव पाहता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन करण्यासाठी महापालिकडे पैसा नाही. विशेष म्हणजे नगर शहरांमध्ये पाणीपुरवठा योजना आज कार्यान्वित नाही. तसेच २०० कोटी रुपये हे महावितरणाचे थकले आहेत. मात्र, महापालिकेने आयुक्तांचे दालन हे नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला. मात्र, याबाबत कुठलीही निविदा प्रक्रिया राबविली नसल्याचा आरोप भुतारे यांनी केला आहे. दरम्यान, भुतारे यांनी महापालिकेतील कारभाराची मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.