Revenue Department | महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती अखेर जाहीर

0
Revenue Department
Revenue Department

Revenue Department | नगर : महसूल विभागातील (Revenue Department) रखडलेल्या पदोन्नती अखेर मंगळवारी (ता.२२) जाहीर करण्यात आल्या आहेत. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची अहिल्यानगरचे (Ahilyanagar) अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेले हे पद अखेर भरले जाणार आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदी पदोन्नती मिळाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापक पदी पदोन्नती मिळाली आहे. तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे येथे माहिती व जनसंपर्क कार्यालयात उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.

नक्की वाचा : मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या 

अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते (Revenue Department)

जानेवारी २०२५ मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्यापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. आता हिंगे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनाला अनुभवी नेतृत्व लाभणार आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची पदोन्नती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदावर झाली आहे. पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा – ऑगस्ट २०१४ ते जून २०१७ आणि ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२५ – या कालावधीत अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

अवश्य वाचा :  स्वारगेट अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापक पदावर झाली आहे. पाटील यांनी एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२५ या दोन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या.

जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच त्यांच्याकडे नाशिक विभागीय उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही असणार आहे. डॉ. मोघे यांनी जिल्ह्यातील निवडणुकांचे दस्तऐवजीकरण, विशेषतः १९५१ पासूनच्या विधानसभा निवडणुकांची पूर्वपिठीका तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकार्‍यांच्या अनुभवाचा फायदा नव्या जबाबदार्‍यांमध्ये निश्‍चितच होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here