Amit Shah : अमित शाहांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघणार : सुजय विखे पाटील

Amit Shah : अमित शाहांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघणार : सुजय विखे पाटील

0
Amit Shah

Amit Shah : नगर : सध्या कांद्याचे (Onion) भाव गडगडले आहे. कांदा निर्यातबंदीचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर बसत असल्याची वस्तुस्थिती खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासमाेर मांडली. शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे आश्वासन दिल्याचे खासदार विखे यांनी सांगितले. 

हे देखील वाचा : शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष व चिन्हांची नावे आली समोर

खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल (Amit Shah)


खासदार विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री शाह यांची नुकतीच भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदींची माहिती दिली. खासदार विखे पाटील म्हणाले, ” शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकवण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा विचार केला, तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे. नगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकारकडून मार्ग निघण्याची आशा आहे.

नक्की वाचा : नगर जिल्ह्यात नवीन एमआयडीसी; ‘या’ गावात ६१८ एकरमध्ये उभारली जाणार उद्याेग नगरी

लवकरात-लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय (Amit Shah)

कांद्याच्या प्रती क्विंटलमागे असलेले दर हे वाढले पाहिजे. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी विनंती केंद्रीय मंत्री शाह यांना करण्यात आली आहे. यावर शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या दृष्टिकोनातून लवकरात-लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन शाह यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here