Oath on Bhagavad Gita: ऑस्ट्रेलियात खासदाराने घेतली ‘भगवत गीते’च्या साक्षीने शपथ

भारतात जन्मलेले बॅरिस्टर वरुण घोष हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत.

0
Oath on Bhagavad Gita
Oath on Bhagavad Gita

नगर : भारतात जन्मलेले बॅरिस्टर वरुण घोष (Barrister Varun Ghosh) हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे ऑस्ट्रेलियातील (Australia) पहिले खासदार ठरले आहेत. लेजेस्लेटिव्ह असेम्ब्ली आणि लेजेस्लेटिव्ह कॉन्सिलकडून निवड झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नवे सेनेटर म्हणून वरुण घोष यांना नियुक्ती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटचे ते सदस्य झाले आहेत.

नक्की वाचा : शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष व चिन्हांची नावे आली समोर

परराष्ट्र मंत्री पेन्नी वोंग यांनी वरुण घोष यांचे संसदेत केले स्वागत (Oath on Bhagavad Gita)

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेन्नी वोंग यांनी वरुण घोष यांचे संसदेत स्वागत केले. त्या म्हणाल्या की, लेबर सिनेट टीममध्ये तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे स्वागत करते. आपले नवे सिनेटर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आहेत. भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे घोष हे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेटर आहेत. मी कायम म्हणते की जेव्हा तुम्ही पहिले असता, तेव्हा तुम्ही शेवटचे नाहीच याची खात्री करावी. सिनेटर घोष हे आपल्या समूदायाचा आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवतील याची मला खात्री आहे, असंही पेन्नी वोंग म्हणाल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनिज यांनी देखील वरुण घोष यांना शुभेच्छा दिल्यात.

वरून घोष कोण आहेत ? (Oath on Bhagavad Gita)

वरुण घोष हे पर्थमधून वकील आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधून कायद्याची पदवी घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये फायनान्स अटोर्नी म्हणून काम केलंय. तसेच वॉशिंग्टन डिसीतील वर्ल्ड बँकमध्ये ते सल्लागार होते. ऑस्ट्रेलियाच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश करुन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. वरुण घोष १७ वयाचे असताना त्यांचे आई-वडील ऑस्ट्रेलियात आले होते. घोष यांचा जन्म १९८५ साली झाला आहे. १९८७ मध्ये ते ऑस्ट्रेलियात आले होते. घोष चांगल्या शिक्षणाला महत्व देतात. चांगले शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे असा त्यांचा विचार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here