Amol Khatal : संगमनेर : नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी महायुतीच्या (Mahayuti) कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. नगर विकास विभाग हा उपमुख्यमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अखत्यारीत आहे. त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी केले.
नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार
अग्निशामक मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहनाचा लोकार्पण (Amol Khatal)
महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत संगमनेर नगरपालिकेला महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन अग्निशामक (गुरखा) मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन मिळाले असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जागीरदार, ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू, शौकत जागीरदार, रोहित चौधरी, सौरभ देशमुख, विकास पुंड, विकास डमाळे, भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने, माजी नगरसेविका अल्पना तांबे, मेघा भगत, कांचन ढोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे आदी उपस्थित होते.