Sujay Vikhe Patil : कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होतेय : डॉ. विखे 

Sujay Vikhe Patil : कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होतेय : डॉ. विखे 

0
Sujay Vikhe Patil : कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होतेय : डॉ. विखे 
Sujay Vikhe Patil : कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होतेय : डॉ. विखे 

Sujay Vikhe Patil : पारनेर: तालुक्याच्या जिरायत भागासाठी कै. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे आणि ते सत्यात उतरत असल्याचा आनंद होत असल्याची भावना माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.

अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना

पाण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला

तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द बाळासाहेब विखे पाटील यांनी दिला होता, तो शब्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्ण करत आहेत. सत्ता आणि पद यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करून जनतेची सेवा करण्याचे बहुमूल्य काम घडत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रमांतर्गत कुकडी कालव्याचे विशेष अस्तरीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, यावेळी डॉ. सुजय विखे बोलत होते. कुकडी कालवा अस्तरीकरणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून जास्तीत जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार

ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित (Sujay Vikhe Patil)

यावेळी विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विक्रम सिंह कळमकर, गणेश शेळके आदी मान्यवर, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आमदार काशिनाथ दाते, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे व गणेश शेळके यांची भाषणे यावेळी झाली.

डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जे काही अपवाद घडले, त्यातून आपल्याला शिकायला हवं. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय मान्य करून आम्ही पुढे चालत आहोत. अनेक गावांतील मागण्या नव्याने समोर आल्या आहेत. यामध्ये जातेगाव व पळवे गावाचा समावेश उपसा सिंचन योजनेच्या सभेमध्ये केला जाईल. उपसा सिंचन सर्व्हेचे सर्वेक्षणाचे काम आता काही दिवसातच सुरू होईल, असा विश्वास देखील डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितांना दिला.