Sujay Vikhe Patil : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

Sujay Vikhe Patil : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

0
Sujay Vikhe Patil : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज
Sujay Vikhe Patil : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

Sujay Vikhe Patil : नगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. या अनुषंगाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार आहेत.

हे देखील वाचा : वाढत्या कोरोनामुळे देवेंद्र फडणवीसांनी केले हे आवाहन

या भेटीदरम्यान कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार आहेत. यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते उदरमल (ता. नगर) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की वाचा : श्रीगोंदे बाजार समिती मधील बंद असलेली कांदा खरेदी सुरू

ते पुढे म्हणाले की, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल. मागील दीड वर्षांच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती. मात्र, आता महायुतीचे सरकार आल्यापासून नगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही. यापुढेही विविध विकास कामांना प्राधान्य देऊन भरीव निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here