Shivrayancha Chhava:’शिवरायांचा छावा’ चं नवं पोस्टर प्रदर्शित;कोण असेल शिवरायांचा छावा ?

Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टरप्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

0
Shivrayancha Chhava

नगर : शिवरायांचा छावा'(Shivrayancha Chhava) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर (New Poster Out) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नक्की वाचा : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

‘शिवरायांचा छावा’ या सिनेमातील पोस्टर रिलीज झाल्यामुळे या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दिग्पाल लांजेकरने या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची रौद्र झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्या मागे एक सिंहदेखील दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”गर्जतो आमच्या देही..रक्त बिंदू रक्त बिंदू…राजे आले आमचे..आले रौद्र शंभू रौद्र शंभू”. या पोस्टवर विशाल निकम, वैभव तत्त्ववादी यांच्यासह इतरांनी जय शिवराय, जय शंभूराजे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

अवश्य वाचा : श्रीगोंदे बाजार समिती मधील बंद असलेली कांदा खरेदी सुरू

मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने उचललं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली आहे. पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.’शिवरायांचा छावा’ हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here