Animal show : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन

Animal show : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन

0
Animal show : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन
Animal show : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन

अकोले : मागील चार वर्षांच्या खंडानंतर राजूर (Rajur) (ता.अकोले) येथे आयोजित करण्यात आलेल्या देशी-विदेशी व डांगी जनावरांच्या प्रदर्शनात (Animal show) इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब कचरू भोसले यांचा वळू चॅम्पियन (Champion) ठरला. तर अकोले तालुक्यातील सांगवी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू उपविजेता ठरला.

हे देखील वाचा : अहमदगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत


राजूर ग्रामपंचायत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने दाखल झाला आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास परिसरातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो.

नक्की वाचा : शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई


या प्रदर्शनात कृषी विभागामार्फत कृषी प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. यावर्षी लहान मुलांसाठी रहाट पाळणे मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे बालमंडळी आनंद लुटताना दिसून आले. सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, रामा मुतडक, अतुल पवार यांसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनार्थी जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील ९८ शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरे रिंगणात उतरवली होती. यात इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब भोसले यांचा वळू चॅम्पियन ठरला तर अकोले तालुक्यातील सांगवी येथील धोंडीबा बिन्नर यांचा वळू उपविजेता ठरला. यावेळी राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी चोख बंदोबस्तासाठी 50 पोलीस व होमगार्ड ठेवण्यात आले आहे.

वळूमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले शेतकरी-

आदत – धोंडीबा किसन बिन्नर (केळी सांगवी ता.अकोले), दोन दाती – बाळू चंदू लोटे (वारंघुशी, ता.अकोले), चार दाती – भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी ता. इगतपुरी), सहा दाती – नारायण शिवाजी जाधव (पाडळी ता. सिन्नर) तर आठ प्रकारात विठ्ठल सोमा गंभीरे (गंभीरवाडी ता. अकोले) आणि   भागवत रामचंद्र कासार (शेरणखेल, ता.अकोले) यांची गाय गाभण प्रकारात पहिली आली आहे. याबरोबरच इतर प्रकारांतही डांगी जनावरांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here