Anna Hazare : शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी – अण्णा हजारे 

डॉ हजारे म्हणाले, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे आणि त्यांचं काम समाजासाठी फार मोठं काम आहे. वंचितांची दिपावली ह्या अनाथांसाठी मदत करण्याच्या उपक्रमातून अनेकांनी प्रेरणा घेऊन देश, राज्य, गाव उभे राहण्यासाठी निश्चित मदत होणार आहे.

0

अण्णा हजारे: पारनेर : अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी (Elementary teachers) दिवाळीच्या सुट्टीमध्ये एकत्र येऊन कोरोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील दगावलेले आहेत, अशा अनाथ विद्यार्थ्यांसाठी मदत निधी गोळा करून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचे काम केलं हीच खरी त्या वंचिताच्या जीवनामध्ये दिपावली आहे. रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी काढले.

नक्की वाचा : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

राळेगणसिद्धी येथील ट्रेनिंग सेंटरमधील सभागृहात वंचितांची दिपावली उपक्रमात आई-वडील नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदतनिधी आणि दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी रावसाहेब रोहोकले, जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, पारनेरचे गटशिक्षणाधिकारी आर.टी. केसकर, भाऊसाहेब डेरे गुरुजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा :  ‘नागरिकांनी १९६७ पूर्वीचे कुणबी नाेंदीचे पुरावे दाखल करा’

डॉ हजारे म्हणाले, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे आणि त्यांचं काम समाजासाठी फार मोठं काम आहे. वंचितांची दिपावली ह्या अनाथांसाठी मदत करण्याच्या उपक्रमातून अनेकांनी प्रेरणा घेऊन देश, राज्य, गाव उभे राहण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. खरं तरी जो स्वतःसाठी जगतो तो कायमचा मरतो आणि जो दुसऱ्यासाठी मरतो तो कायमचा जगतो उक्तीप्रमाणे या शिक्षकांनी जे काम केलेलं आहे ते निश्चित समाजाला दिशादर्शक आहे. अनाथांना त्यांच्या जीवनामध्ये आशावाद निर्माण होईल.

अण्णा हजारे यांनी रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रतिष्ठानच्या आणि शिक्षकांच्या भावी कार्याला शुभेच्छा देत असेच मोठं काम यापुढील काळात करावे अशी अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिक्षक नेते प्रविण ठुबे, सुनील दुधाडे, अविनाश निंभोरे, नानासाहेब बडाख, बाबा पवार, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानेश्वर इंगळे, संतोष खोमणे, बाबासाहेब धरम, राजेंद्र पोटे, शिवाजी कोरडे, संदीप सुंबे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here