Australia Vs India : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

Australia Vs India : ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला सहा गडी व ४२ चेंडू राखून पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले

0
158
Australia Vs India : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता
Australia Vs India : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (ता. १९) ऑस्ट्रेलिया विरुद्ध यजमान भारत (Australia Vs India) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला सहा गडी व ४२ चेंडू राखून पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषकावर (World Cup) आपले नाव कोरले.

हे देखील वाचा : छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; छत्रपती संभाजीराजे यांचा हल्लाबोल

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने ३१ चेंडूंत ४७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर शुभमन गिल (४ धावा) व श्रेयस अय्यर (४ धावा) हे झटपट बाद झाले.

विराट कोहली व के.एल. राहुलने ६७ धावांची भागिदारी केली. विराट कोहली ५४ धावा करून तर के.एल. राहुल ही ६६ धावा करून बाद झाला. भारताचा संपूर्ण संघ ५० षटकांत २४० धावाच जमवू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले.

नक्की वाचा : घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

२४१ धावांचे तुटपुंजे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी झटपट धावा जमविण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. मात्र, त्यानंतर मार्नस लॅबशॅन व ट्रॅव्हिस हेड यांनी १९२ धावांची भागिदारी करत विजयाचा मार्ग सुकर केला. हेडने १३७ धावा तर लॅबशॅनने नाबाद ५८ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाने ४३ षटकांत चार गडी गमावत २४१ धावा करत विजय मिळविला.

हेही पहा : Who will Win ICC worldcup 2023 Predictions | यंदाचा विश्वचषकावर कोण नाव कोरणार?

भारताकडून जसप्रित बुमराहने सर्वाधिक दोन फलंदाज बाद केले. ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. विराट कोहली मालिकावीर ठरला. भारताच्या या पराभवाने भारतीय क्रिकेट संघावरील टीकाकारांची संख्या वाढली आहे. सलग दहा सामने एकतर्फी जिंकलेल्या भारताने अंतिम सामना गमावल्याने भारतीय प्रेक्षकांत मोठी नाराजी आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला टी-२०मधील प्रथम क्रमांकाचा संघ होण्याची संधी आहे. काल (रविवारी) झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून भारतीय संघ कसा सावरतो यावरच पुढील दौऱ्याचे भवितव्य ठरणार आहे. आर. अश्वीन, हार्दिक पंड्या, अजिंक्य राहणे, शिखर धवन असे मोठे खेळाडू या संघात नव्हते मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हे खेळाडू दिसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here