Hygiene first : नगर : उत्तम व चवदार पण स्वच्छ ठिकाणी बनलेले खाद्य पदार्थ मिळावे यासाठी हॉटेल, बेकरी, खाद्य पदार्थ तयार करून विकणारी दुकाने स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका, हायजिन फर्स्ट (Hygiene first) व आय लव्ह नगर (I love Nagar) यांनी सुरु केलेले किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान कौतुकास्पद आहे. आरोग्याच्या दृष्टीने साफ जागेत, स्वच्छ किचनमध्ये खाद्य पदार्थ बनवणे गरजेचे आहे, सर्वांना निर्जंतुक अन्न मिळावे, यासाठी व्यावसायिकांनी स्वच्छतेची खात्री ग्राहकांना पटवून द्यावी आणि ग्राहकांनी देखील आपण जे अन्न खातो ते स्वच्छ आहे की नाही याची खात्री करावी. जेणेकरून नगर शहरातील व्यावसायिकांच्या किचनच्या माध्यमातून स्वच्छतेकडून आरोग्याकडे वाटचाल केली जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण जगताप (Arun Jagtap) यांनी केले.
हे देखील वाचा : अहमदगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत
नगर महापालिका, हायजिन फर्स्ट व आय लव्ह नगरतर्फे किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियानाचा प्रारंभ माजी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रा. माणिक विधाते, महापालिका आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, डॉ. विजय भंडारी, मंगेश खताळ, वैशाली गांधी, आरती गिरवले, तुषार भंडारी, विजय देशपांडे, विकास जाधव, बाबासाहेब शिंदे, दीपाली चुत्तर, अनुराधा रेखी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
वैशाली गांधी म्हणाल्या की, नगरकरांना स्वच्छ अन्न मिळावे यासाठी किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान २६ जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. खाद्य पदार्थ क्षेत्रात एक स्वच्छता चळवळ उभी राहावी. स्वच्छतेची सवय लागावी. त्यासाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्राहकांनी क्यू आर कोड स्कॅन करून आपण हॉटेलमध्ये खाल्लेल्या पदार्थांची माहिती कळवावी. या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. यात स्वच्छ किचन, पिण्याचे पाणी, शौचालय, परिसरात वृक्ष लागवड व सुशोभीकरण, ओला सुका कचरा व्यवस्थापन याचे निकष लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.