Arun Tanpure : अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल

Arun Tanpure : अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल

0
Arun Tanpure : अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल
Arun Tanpure : अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल 

Arun Tanpure : राहुरी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे (Dr. Baburao Bapuji Tanpure Sahakari Sakhar Karkhana) नूतन अध्यक्ष अरुण तनपुरे (Arun Tanpure) आणि त्यांचे पुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे (Harsh Tanpure) यांनी मंगळवारी (ता.२४) रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला.

नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

राहुरी तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलणार

गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, ज्याला अखेर मुहूर्त मिळाला. राहुरी तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलणार, यादृष्टीने या घटनेकडे पाहिले जात आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सांगता सभेत तालुक्याला एक गोड बातमी लवकरच मिळणार असे संकेत सभापती अरुण तनपुरे यांनी दिले होते. कारखाना चालवायचा असेल तर राजाश्रय गरजेचा आहे. राजाश्रयाशिवाय डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकत नाही, या दृष्टीने अरुण तनपुरे यांचा गट भाजपामध्ये प्रवेश करणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा चालू होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्हीही गटाचे मनोमीलन होणार अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे तनपुरेसाठी महायुतीच्या जवळचा शॉर्टकट कोणता राहणार या विषयी उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपुष्टात आली असून या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रमुख नेत्यांची उपस्थिती (Arun Tanpure)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, येत्या आठवड्यात मंगळवारी अरुण तनपुरे यांना मानणारे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते. या गटातील प्रवेशामुळे आता प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना समजली जाते.