Fraud : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Fraud : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
Fraud : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Fraud : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Fraud : नगर: अहिल्यानगर येथील एका व्यावसायिकाची सीए (CA) कडून ३८ लाखाची फसवणूक (Fraud) झाली असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवली पोलीस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना

गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी

सचिन आप्पासाहेब दुधाडे (रा. भिस्तबाग, नगर पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), देवेंद्र अण्णासाहेब पाटील (रा.यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), सोनाली लोणकर, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत राजेश बाळासाहेब भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार

फिर्यादीत म्हटले आहे की, (Fraud)

फिर्यादी यांचे गंजबाजार येथील दुकान आहे. या दुकानाचे जीएसटी भरणा करण्याकरिता देवेंद्र अण्णासाहेब पाटील व सचिन दुधाडे, सोनाली लोणकर यांच्याकडे सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, एस. पी. असोसिएट व एस.डी.असोसिएट या नावाने सीए फर्म असल्याचे सांगितले. आम्ही मोठं मोठ्या कंपनीचे ऑडिट करतो. त्यामुळे आमचा विश्वास संपादन करून २०२१ ते २०२४ या कालावधीत तब्बल ३८ लाख रुपये जीएसटी ची रक्कम वेळोवेळी भरली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या फर्मच्या बाबत आयकर विभागात जीएसटी बाबत चौकशी केली. मात्र,आपण भरलेली जीएसटीची रक्कम दिसत नसल्याचे सांगितले. त्यांनी ते कागदपत्र आयकर विभागात दाखविले असता ते खोटे असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीची ३८ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.