Arunkaka Jagtap | माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

0
Arunkaka Jagtap
Arunkaka Jagtap

Arunkaka Jagtap | नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप (Arunkaka Jagtap) (वय ६८) यांचे आज (ता. २) पहाटे निधन झाले. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप (Sachin Jagtap) यांचे ते वडील होत. 

नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार   

अनेक पदे भुषवली (Arunkaka Jagtap)

आमदार अरूण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविले. अहिल्यानगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार अरुण जगताप हे सलग दोनवेळा अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानपरिषदेवर ते निवडून गेले होते. ५ एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्ब्येतील बाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली होती. उपचारा दरम्यान माजी आमदार जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

अवश्य वाचा :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण;’या’ मान्यवरांची वर्णी  

आज सायंकाळी अंत्यविधी (Arunkaka Jagtap)

माजी आमदार जगताप यांचे अंतिम पार्थिव दर्शन शुक्रवारी (ता. २) दुपारी २ वाजता भवानीनगर येथील जगताप यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भवानीनगर, महात्मा फुले चौक, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रस्ता, आयुर्वेद कॉलेज, बाबावाडी मार्गे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे नेण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता अंत्यविधी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here