Samantha Ruth Prabhu:समंथासाठी काय पण!चाहत्याने वाढदिवशी चक्क मंदिर उभारलं!

0
Samantha Ruth Prabhu:समंथासाठी काय पण!चाहत्याने वाढदिवशी चक्क मंदिर उभारलं!
Samantha Ruth Prabhu:समंथासाठी काय पण!चाहत्याने वाढदिवशी चक्क मंदिर उभारलं!

नगर : दाक्षिणात्य कलाकारांची जनतेमध्ये मोठी क्रेझ आहे. नुकताच आंध्रप्रदेशातील (Andrapradesh) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे. २८ एप्रिल रोजी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिचा वाढदिवस साजरा केला. आता समंथांच्या चाहत्याने बांधलेले तिचं मंदिर प्रसिद्धीच्या (Samantha Temple) झोतात आले आहे.

नक्की वाचा : मनोज जरांगेंची मोठी घोषणा;’या’ दिवशी करणार पुन्हा उपोषण  

चाहत्याने उभारलं समंथाचे मंदिर (Samantha Ruth Prabhu)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री समंथाचे मंदिर दिसत आहे. या चाहत्याने या मंदिरात अभिनेत्रीचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. व्हिडिओमध्ये मंदिराबाहेर ‘समंथाचे मंदिर’ असे लिहिलेले दिसत आहे. आत प्रवेश केल्यावर समंथाचे दोन पुतळे दिसतात,त्यापैकी एक सोनेरी रंगाचा आहे.त्या चाहत्याने अभिनेत्रीसाठी केवळ मंदिरच बांधले नाही तर अनाथ मुलांसाठी एक पार्टी देखील आयोजित केली. अनाथ मुलांसोबत समंथाच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला.

अवश्य वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार   

समंथाचे मंदिर बांधणाऱ्या चाहत्याचे नाव तेनाली संदीप आहे. त्याने माध्यमांशीही संवाद साधला. तेनाली म्हणाला, ‘मी आंध्र प्रदेशचा आहे. मी समंथाचा खूप मोठा चाहता आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मी काही वर्षांपूर्वी हे मंदिरही बांधले होते. दरवर्षी मी समंथाच्या वाढदिवसाला मुलांना खायला घालतो आणि केक कापतो. समंथाने मला खूप प्रेरणा दिली आहे, असं त्याने सांगितलं आहे.

समंथाची कारकीर्द   (Samantha Ruth Prabhu)

अभिनेत्री समंथाच्या गेल्या वर्षी ती ‘सिटाडेल हनी बनी’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवन देखील होता. ती ‘ब्रह्मांड’ ही वेब सिरीज देखील करत आहे. निर्माती म्हणून, समंथाचा एक चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे.