Ashutosh Kale:’सरकार कुठलेही असो, सातत्याने गोदावरी कालव्यांच्या शेतकऱ्यावर अन्याय’:आशुतोष काळे

Ashutosh kale : सरकार कुठलेही असो,सातत्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,याकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.

0
Ashutosh kale

राहाता : चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे अतिशय कमी पर्जन्यमान (Low Rainfall) झाल्यामुळे गोदावरी कालव्यांच्या (Godavari Canal) लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती आहे,असं असताना देखील परत एकदा समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर-नाशिकच्या धरणातून खाली पाणी सोडण्यात आले. सरकार कुठलेही असो,सातत्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,याकडे आमदार आशुतोष काळे(MLA Ashutosh Kale) यांनी विधानसभेचे (Assembly)लक्ष वेधले. समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) केली.

नक्की वाचा : चिअर्स ! थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू

हिवाळी अधिवेशनात आमदार काळे यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, येवला आणि नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या तालुक्याच्या शेतकऱ्यांना मागील ब्रिटिश काळात शंभरपेक्षा जास्त वर्षापासून गोदावरी कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी मिळते. सुरुवातीला सिंचनासाठी बारमाही पद्धतीने पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना ब्लॉक देण्यात आले. त्या नंतर या ब्लॉकच्या संख्येत कपात करून हे ब्लॉक पन्नास टक्के रह करण्यात आले आणि आता पूर्णपणे ब्लॉक नुतनीकरण करण्यासाठी थांबवले आहे.

अवश्य वाचा : मराठा आरक्षणाच्या आड येणारांना गुलाल लागू देणार नाही : मनोज जरांगे

अशा परिस्थितीत चालूवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना देखील नगर-नाशिकच्या वरच्या धरणातून खालच्या धरणात पाणी सोडून पुन्हा अन्याय करण्यात आला आहे. वास्तविक पाहता ही धरणे ब्रिटिश काळात शंभर वर्षांपूर्वी बांधली गेली आज धरणे तेवढीच आहे, पाणी ही तेवढेच आहे व जमिनी ही तेवढ्याच आहेत. परंतु, जसजसा काळ पुढे गेला तशी लोकसंख्या वाढली, औद्योगीकरण वाढले, नागरिकरण वाढले व या धरणांच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर बिगर सिंचनाचे आरक्षण वाढले. आता या धरणांचे पाणीसाठे कसे वाढतील, पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळून गोदावरी कालव्यांना पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.  तरी कायद्यामध्ये बदल करून तो अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  

मागील चार वर्ष २०१९ ते २०२३ पर्यत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होत असल्यामुळे सर्वत्र मुबलक पाणी होते. नगर-नाशिकच्या वरच्या धरणांमध्ये व खालच्या धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची अडचण भासली नाही.परंतु,यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळी परिस्थिती होती. अशीच परिस्थिती नाशिकच्या धरणक्षेत्र परिसरामध्ये असल्यामुळे एकवेळ धरणे भरतात का नाही ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर धरणक्षेत्र परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरली गेली. मात्र खालच्या धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेवून वरच्या धरणातील पाणी खाली सोडण्यात येवून गोदावरी कालव्याच्या लाभ धारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे, असे आमदार काळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here