Ayodhya : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

0
Ayodhya : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती
Ayodhya : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती

Ayodhya : नगर : अयाेध्येतील (Ayodhya) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी (celebration) जय्यत तयारी सुरू झाली आहे. रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी (Ram Mandir) गुजरातच्या वडाेदरामध्ये १०८ फूट लांब, ३.५ फूट रुंद महाअगरबत्ती तयार करण्यात आली आहे. तिचे वजन ३,४२८ किलाे आहे. ही अगरबत्ती ११० फूट लांबीच्या ट्रेलरवर ठेवली जाईल. १ जानेवारीला अयाेध्येला नेण्यात येणार आहे. ही अगरबत्ती ४५ दिवस जळत राहील.

Ayodhya : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार
Ayodhya : अयाेध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी १०८ फूट अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

हे देखील वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा

विहाभाई करशनभाई भरवाड यांनी ही अगरबत्ती बनवली आहे. भरवाड यांनी माहिती देताना सांगितले की, ”मे महिन्यापासून अगरबत्ती बनवण्यास सुरवात केली आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाला आहे. अगरबत्ती अयाेध्येला नेण्यासाठी सुमारे १५ लाख खर्च येणार आहे. अगरबत्तीमध्ये १४७५ किला गीर गाईचे शेण, १९१ किलाे गीर गाईचे तूप, २८० किलाे देवदाराचे लाकूड, ३७६ किलाे गुग्गल, २८० किलाे तीळ, २८० किलाे बार्ली, ३७६ किलाे खाेपरे पावडर, ४५० किलाे हवन साहित्य, २५० किलाे गुलाबाचे फूल, २०० किलाे परफ्यूम वापरण्यात आले आहे.

नक्की वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here