Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात

Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात

0
Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात
Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : आपल्या देशामध्ये विविध जाती धर्मामध्ये अनेक मोठ मोठे संत होऊन गेले. वारकरी संप्रदायाला (varkari sampradaya) मोठी समृद्ध परंपरा असून सर्वांनी सर्व धर्म समभाव व एकात्मता जपत मानवतेचा हाच खरा धर्म ही संतांची शिकवण असल्याचे सांगितले आहे, असे प्रतिपादन काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. वसंत लॉन्स येथे वारकरी संवाद मेळाव्यानिमित्ताने ते बोलत होते.

नक्की वाचा: संगमनेर विधानसभेत दोघांची माघार तर १३ उमेदवार रिंगणात

यांची उपस्थिती

यावेळी व्यासपीठावर आमदार आमदार डॉ. सुधीर तांबे, दत्तात्रय महाराज भोर, सुनील महाराज मंगळापूरकर, सुदाम महाराज कोकणे, डॉ.जयश्री थोरात, व्यंकटेश महाराज सोनवणे, रोहिदास महाराज बर्गे, बाळकृष्ण महाराज करपे, जयश्रीताई तिकांडे, सिताराम राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, (Balasaheb Thorat)

देशामध्ये अनेक जातीवाद होतांना आपण पाहत आहे. परंतु संतांनी कायम सर्व समाजाला समानतेचा संदेश देण्याचे काम केले. आजही वारकरी संप्रदाय हे सर्व धर्म समभाव, समानता म्हणून ज्ञानदान करण्याचे काम करत. ज्याचे त्याचे काम प्रत्येकाने प्रामाणिक करावे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कायम विकासाचे राजकारण केले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मी माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात कधी चुकीचे. सुडाचे राजकारण केले नाही. वेळप्रसंगी विरोधकांना सुद्धा मदत केली. सध्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे. ते काळजी करण्यासारखे आहे.

Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात
Balasaheb Thorat : मानवता धर्म ही संतांची शिकवण : थोरात

देशाची परंपरा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाने आता समाज प्रबोधन करण्याचे काम करावे लागेल. राजकारण्यांनी राजकारण करताना पातळीत राहून बोलले पाहिजे. माझ्या जिवनात निळवंडे धरणाचे काम पूर्ण करण्याचे सर्वात मोठे भाग्यच आहे. या कामाने शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, वारकरी संप्रदाय हा माझा आवडीचा विषय आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये लहान मोठे हा भेदभाव कधीही नसतो. म्हणूनच परंपरा कायम टिकून आहे.