Beating : श्रीरामपूर: तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या पुणतांबा येथील गोदावरी नदीतून पाणी घेऊन निघालेल्या राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील कावडीवाल्यांच्या अंगावर धावून जात त्यांना दमदाटी (Beating) करण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौकात पुन्हा एकदा घडला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
दगड मारून जखमी
तमनर आखाडा येथील मुळाबाई देवीच्या यात्रेसाठी तेथील मुले पुणतांबा येथे दरवर्षीप्रमाणे कावडीने पाणी आणण्यासाठी आले होते. रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान कावडीचे पाणी घेऊन हे मुले श्रीरामपूर शहरात पोहचली. शहरातील मस्जिद जवळील ब्रिजपासून पुढे निघाल्यानंतर अचानक तीन ते चार जणांनी या कावड घेऊन निघालेल्या मुलांच्या अंगावर धावून जात एका तरुणाला दगड मारून जखमी केले. यावेळी आजूबाजूला असणाऱ्यांनी तत्काळ वादात मध्यस्थी केली. याप्रकरणी जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दमदाटी व मारहाण करणाऱ्या चौघा अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार
कठोर कारवाईची मागणी (Beating)
पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. यापुर्वीही कावडीवाल्यांवर हल्ला होण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यावरून शहराचे वातावरण बिघडले होते. आता पुन्हा यात्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने अशा अपप्रवृत्ती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.