Sangharshyodha New Song:’संघर्षयोद्धा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती प्रदर्शित 

संघर्षयोद्धा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती गायली गेली आहे. उत्तम शब्द, ताल धरायला लावणारं संगीत आणि आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे.

0
Sangharshyodha New Song
Sangharshyodha New Song

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली. त्यात आता जय देव जय देव शिवराया’ (Jai Dev jai Dev Jai Shivraya) या गाण्याची भर पडणार आहे. गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

नक्की वाचा : अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया मराठी चित्रपटात झळकणार

संघर्षयोद्धातील छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती प्रदर्शित (Sangharshyodha New Song)

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्षयोद्धा या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे. चित्रपटाच्या टीजर व ट्रेलरसह उधळीन जीव, मर्दमावळा शिवरायांचा वाघ या गाण्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे.आता या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती गायली गेली आहे. उत्तम शब्द, ताल धरायला लावणारं संगीत आणि आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे.

अवश्य वाचा : मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर येणार चित्रपट

शिवाजी दोलताडे यांनी केले संघर्षयोद्धाचे दिग्दर्शन (Sangharshyodha New Song)

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. तर सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केले. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे,अरबाज शेख,अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here