Bhagwan Mahaveer : श्रीरामपुरात ‘विरा विरा जय महावीरा’चा जयघोष

Bhagwan Mahaveer

0
Bhagwan Mahaveer
Bhagwan Mahaveer

Mahavir Jayanti : श्रीरामपूर: भगवान महावीर (Bhagwan Mahaveer) जन्मकल्याणक उत्सवानिमित्ताने शहरातून महावीर भगवंताच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ‘विरा विरा जय महावीरा, महावीर का क्या संदेश जिओ और जिने दो’ च्या जयघोषाणे शहर परिसर दुमदुमला होता. येथील दिगंबर जैन समाज (Digambar Jain Samaj) व स्थानकवासी जैन संघ, संभवनाथ मूर्तीपूजकसंघ या सकल जैन संघाच्यावतीने श्री महावीर जयंती जन्मकल्याणक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जैनस्थानकमध्ये जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्रमण संघाच्या जैन साध्वीजीपूज्या श्री चन्द्रकलाश्रीजी म.सा., पूज्या श्री स्नेहाश्रीजी म.सा., पूज्या श्रुतप्रज्ञाश्रीजी म.सा. या तीन साध्वींनी मिरवणुकीतील भाविकांना नवकार महामंत्र (Navkar Mantra) जाप दिला. काही काळ त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या.

हे देखील वाचा: लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट

भव्य शोभायात्रेचे आयोजन (Bhagwan Mahaveer)

यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी श्रध्दा स्वागत काला यांना कळस घेण्याचा मान मिळाला होता. मिरवणूक मेनरोडवरील दिगंबर जैन मंदिरापासून भगवान महावीरांच्या सजविलेल्या पालखीची व प्रतिमेची शोभायात्रा निघून मेन रोड, शिवाजी रोड मार्गे , महात्मा गांधी पुतळ्यापासून जैन मंदिराजवळ समारोप झाला. दिगंबर जैन मंदिर व संभवनाथ मूर्तीपूजक जैन मंदिरामध्ये भगवंताच्या प्रतिमेवर अभिषेक व पूजा विधी करण्यात आली. जैनस्थानकमध्ये पूज्या चन्द्रकलाश्रीजी म.सा., पूज्या स्नेहाश्रीजी म.सा., पूज्या श्रुतप्रज्ञाश्रीजी म.सा.या तीन साध्वींच्या उपस्थितीत नवकार महामंत्र जाप करण्यात आला. महासतीजींचे प्रवचन व मंगलपाठाने समारोप झाले.

नक्की वाचा: शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत (Bhagwan Mahaveer)

Bhagwan Mahaveer
Bhagwan Mahaveer

मेनरोडवर संभवनाथ मूर्तीपूजक संघाच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. शिवाजी रोडवर गिरमे चौकात महावीर युवा मंचच्यावतीने पाणी वाटप करण्यात आले होते. जैनस्थानकासमोर मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. स्थानवासी जैन मित्र मंडळाच्यावतीने थंड पेय देण्यात आले. भगवान महावीर चौकात जैन ड्युडसच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी दिगंबर जैन मंदिरात आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगरध्यक्ष करण ससाणे, बाजारसमितीचे माजी सभापती सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, किरण लुणिया, दिलीप नांगरे, सिध्दार्थ मुरकुटे, शेतकरी संघटनेचे अभिजीत पोटे, अशोक उपाध्ये, विजय खाजेकर, भाऊ डाकले, महेद्र त्रिभुवण, नीलेश नांगले, अनिल छाबडा, तिलक डुंगरवाल, दिपाली प्रकाश चित्ते, अर्चना पानसरे, भगवान महावीर चौकात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. दिगंबर जैन समाजासाठी व्यापारी मंगल कार्यालयात गौतम प्रसादचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भगवंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर जैन समाज अध्यक्ष संजय कासलीवाल, संभवनाथ मूर्तीपूजक संघ विश्वस्त शैलेश बाबरीया व स्थानकवासी जैन संघाचे विश्वस्त रमेश लोढा व ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, रमन मुथ्था, अनिल पांडे, सुरेश बाठिया, मनसुख चोरडिया, कल्याण कुंकुलोळ, प्रेमचंद कुंकुलोळ, अमित गांधी, अ‍ॅड. सुहास चुडिवाल, जितेंद्र कासलिवाल, नितीन मिरीकर, गुलाबचंद झांजरी, महावीर काला, प्रशांत आर.पाटणी, प्रशांत बोहरा, पंकज पांडे, अमित गोधा, मयुर पाटणी, महावीर पाटणी, विनोद पाटणी, विजय दुलिचंद पांडे, गौरव चुडीवाल, राजेश रमेश चुडिवाल,अनिल चुडीवाल, राहुल पांडे, विजय अशोक सोनी, विमला पांडे, सुरेश झांजरी, स्थानकवासी जैन संघ, भारतीय जैन संघटना, वीर सेवा दल, आदर्श जैन महिला व बहुमंडळ, नवकार प्रतिष्ठाण, आनंद प्रार्थना ग्रुप, चंदना महिला मंडळ, शांतीसागर पाठशाळा ,महावीर युवा मंच, जैन ड्युडस, आनंदामृत कन्या मंडळ व जैनस्थानक चौक मित्रमंडळ आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here