Wrestling : कर्जत केसरीचा किताब रोहित मोढळेने पटकावला

Wrestling : कर्जत केसरीचा किताब रोहित मोढळेने पटकावला

0
Wrestling
Wrestling : कर्जत केसरीचा किताब रोहित मोढळेने पटकावला

Wrestling : कर्जत : भास्करदादा तोरडमल आणि दिलीपनाना तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिम्मित आयोजित कुस्ती (Wrestling) मैदानात कर्जत केसरीचा (Karjat Kesari) रोहित मोढळे मानकरी ठरला. तर रामकृष्ण पोटरे याने राजमुद्रा केसरीचा (Rajamudra Kesari) किताब पटकावला. राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार तोरडमल यांनी या प्रेक्षणीय कुस्त्यांचे आयोजन केले होते.

हे देखील वाचा: खाेटं बाेल पण रेटून बाेल, हा शरद पवारांचा धंदा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी डागलं टीकास्त्र

१० ते १२ महाराष्ट्र चॅम्पियनचा सहभाग (Wrestling)

सदर कुस्ती मैदानाचे उद्घाटन सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीच्या हस्ते करण्यात आले. कर्जत येथील कै भास्करदादा तोरडमल आणि दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुलाच्या आवारात महाराष्ट्रासह हरियाणा राज्यातील नामवंत मल्लांनी या कुस्ती मैदानासाठी हजेरी लावत हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित प्रेक्षणीय आणि काळजाचा ठोका चुकविणाऱ्या कुस्त्या पार पाडल्या. विशेष म्हणजे यामध्ये १० ते १२ महाराष्ट्र चॅम्पियन तर २ उपमहाराष्ट्र केसरी मैदानात उतरले होते. कर्जत केसरी या मानाच्या किताबासाठी रोहित मोढळे आणि धुलाजी इरकर यांच्यामध्ये कुस्ती रंगली असता मोढळेने इरकर यास अस्मान दाखवत कर्जत केसरीचा किताब, चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांची रक्कम पटकावली. तर राजमुद्रा केसरीसाठी रामकृष्ण पोटरे याने दिल्लीच्या राकेशकुमार वर डाव टाकून विजय मिळवत राजमुद्रा केसरी किताबाचा मानकरी ठरला.

नक्की वाचा:लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट

अनेक मल्लांच्या लक्षवेधी कुस्त्या (Wrestling)

यासह तुफानी लढतीत उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विरुद्ध प्रकाश बनकर कुस्तीत शेळकेने हप्ते डावावर बनकर वर विजय मिळवला. मनोरंजन कुस्तीमध्ये नेपाळ देशातील देवा थापा याने हरियाणाच्या सुमितकुमार वर विजय मिळवून मनोरंजन कुस्ती जिंकली. तसेच दिलीप नाना गुलाबराव तोरडमल संकुलातील अनेक मल्लांनी लक्षवेधी कुस्त्या करून बक्षिसे पटकावली. या कुस्ती मैदानासाठी जिल्ह्यासह राज्यातील कुस्ती शौकिनांनी हजेरी लावत मल्लांचे मनोबल वाढवले. त्यांच्या बैठकीसाठी आयोजक विजयकुमार तोरडमल यांनी भव्य प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था केली होती. मैदान यशस्वीतेसाठी कुस्ती संकुलाचे वस्ताद ईश्वर तोरडमल, धरम परदेशी, वैभव सुपेकर, किरण नरवडे, सचिन जाधव, अप्पू लाळगे, अशोक तोरडमल, बच्चन मांडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here