Bhandardara : अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन विभागाकडून निर्बंध

Bhandardara : अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन विभागाकडून निर्बंध

0
Bhandardara : अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन विभागाकडून निर्बंध
Bhandardara : अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन विभागाकडून निर्बंध

Bhandardara : अकोले: निसर्गाचा अद्भुत नजारा असणाऱ्या भंडारदरा (Bhandardara) परिसरातील कळसूबाई – हरिश्चंद्रगड (Harishchandragad) अभयारण्यात सुरक्षेच्या कारणास्तव आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेत वन्यजीव विभागाने अभयारण्यात (Sanctuary) येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर बंधन घातले आहे. वन्यजीव विभागाच्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात एका वेळेला प्रथम येणाऱ्या ६०० पर्यटकांनाच (Tourist) प्रवेश देण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्र हे धूम्रपान, मद्यपान निषिद्ध क्षेत्र असल्यामुळे मद्यपान केलेल्या पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास, रील्स बनविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांनी गाइड, सुरक्षा कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत घातल्यास, गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल रुपेश गावित आणि प्रतिभा सोनवणे यांनी सांगितले.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

अन्य पर्यटकांना दुपारी ३ नंतर प्रवेश नाही (Bhandardara)

भंडारदरा वनक्षेत्रात धरणालगत असणाऱ्या घाटघर रस्ता तसेच रतनवाडी रस्ता येथे वन विभागाचे तपासणी नाके आहेत. अभयारण्य क्षेत्रात हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे इत्यादी ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत असे पर्यटक वगळता अन्य पर्यटकांना दुपारी ३ वाजेनंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सायंकाळी ५ नंतर कोणत्याही पर्यटकास अभयारण्य क्षेत्रात फिरण्यास सक्त मनाई केली आहे.