Raj Thackeray : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

Raj Thackeray: हिंदी विरोधातील मोर्चाची तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

0
Raj Thackeray: हिंदी विरोधातील मोर्चाची तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा
Raj Thackeray: हिंदी विरोधातील मोर्चाची तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

Raj Thackeray : नगर : राज्यात पहिलीच्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी (Hindi Language) शिकवण्याच्या सक्तीविरोधात राजकीय वर्तुळातून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबद्दल आज मोठी घोषणा देखील केली आहे. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ६ जुलै रोजी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु हा मोर्चा आता एक दिवस आधीच म्हणजे ५ जुलैला होणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. ६ तारखेला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) असल्याने मोर्चाची तारीख बदलल्याचं बोललं जातंय.

नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

सर्व राजकीय पक्ष, विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

५ जुलै रौजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांनी तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ६ जुलैला एकादशी आहे. त्यामुळे मोर्चाची तारीख बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंदी भाषेची सक्ती लादू देणार नाही – उद्धव ठाकरे (Raj Thackeray)

हिंदी येत नसल्याने कुणाचंही काहीही अडलेलं नाही. भाजपाचं एकाधिकारशाहीचा छुपा अजेंडा मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील हिंदी भाषा लादण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषा आम्ही या सरकारला लहान मुलांवर लादू देणार नाही. मी आज तमाम मराठी माणसांना आमच्या लढ्यात पक्षीय भेदाभेद विसरून सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. मराठी कलाकार, साहित्यिक, खेळाडू, वकील अशा सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.