Paaru Marathi Serial : भरत जाधव यांची झी मराठीच्या ‘पारू’ मालिकेत एन्ट्री

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते भरत जाधव यांची झलक ‘पारू’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

0
Paaru Marathi Serial
Paaru Marathi Serial

नगर : ‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनीवर काही जुन्या मालिका संपल्या आहेत.आता झी मराठीवर नुकतीच ‘पारू’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharyu Sonawane), प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील काही दिवसांपासून या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर १२ फेब्रुवारीला या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, पहिला भाग प्रसारित झाल्यावर प्रेक्षकांना एक खास सरप्राईज मिळालं आहे.

नक्की वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये एंट्री  

अभिनेते भरत जाधव यांची झलक ‘पारू’ मालिकेत एन्ट्री (Paaru Marathi Serial)

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांची झलक ‘पारू’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘पारू’ या मालिकेचं संपूर्ण कथानक अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं बलाढ्य साम्राज्य आणि गावाकडून आलेली साधीभोळी ‘पारू’ यावर आधारित आहे. आता ही ‘पारू’ अहिल्यादेवींच्या मनात कशी जागा निर्माण करणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

अवश्य वाचा : बॉलिवूड अभिनेता राहुल देव झळकणार ‘शिवरायांचा छावा’ मध्ये

पारू मालिकेत भरत जाधव राजकीय नेत्याच्या भूमिकेत (Paaru Marathi Serial)

या मालिकेच्या पहिल्याच भागात भरत जाधव हे एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळालेत.अहिल्यादेवींचा लेक आदित्य किर्लोस्करला एका कामानिमित्त भरत जाधव यांची  भेट घ्यायची असते. आदित्य भेटल्यावर “आपण ही डील पक्की करुया का?” असा प्रश्न ते विचारतात. यावर आदित्य त्याला साफ नकार देतो. “ज्या गोष्टी माझ्या आईला मान्य नाहीत त्या मी करणार नाही” असं तो सांगतो.

‘पारू’ या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादेने आदित्य किर्लोस्करची डॅशिंग भूमिका साकारली आहे. पहिल्याच भागात प्रसादला मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी  मिळाली आहे. ‘पारू’च्या निमित्ताने भरत जाधव यांच्या चाहत्यांना छोट्या पडद्यावर या दमदार अभिनेत्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली. २०२० मध्ये त्यांनी ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत काम केलं होतं.  ‘पारू’ मालिकेतील पुढच्या भागांमध्ये भरत जाधव दिसणार की नाहीत? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here