नगर : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ‘बिग बॉस’ च्या १७ व्या (Bigg Boss 17) पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात मुनव्वर फारुकीने (MunawarFaruqui) बिग बॉस-१७ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यावेळी सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-१७ या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.
नक्की वाचा : कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू
मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७’ चा विजेता (Bigg Boss 17 Winner)
‘बिग बॉस’ च्या १७ व्या सीझनमध्ये टॉप ५ स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी व अरुण या स्पर्धकांचा समावेश होता. अखेर अटीतटीच्या या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून मुनव्वर फारुकी विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. संपूर्ण सीझन त्याने चांगली कामगिरी केली.
अवश्य वाचा : रामाचे मंदिर उभारून अपमानाचे परिमार्जन व प्रक्षालन केले – सुनील देवधर
मुनव्वर फारुकी नेमका कोण ? (Bigg Boss 17 Winner)
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या संकटांवर मात करत त्याने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. एका वादग्रस्त स्टँड-अप अॅक्टमुळे मुनव्वर चर्चेत आला. हळूहळू एक स्टँड-अप कॉमेडीयन म्हणून तो लोकप्रिय झाला. गुजरातच्या जुनागढजवळील एका छोट्याशा गावातून आलेल्या मुनव्वरला या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. याआधी मुनव्वर कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोचाही विजेता ठरला होता. लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, २० लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गाडी हे मिळाले.