karjat : कर्जत : कर्जतमध्ये भाजपाची (Bhartiy Janata Party) तालुका कार्यकारिणी (Taluka Executive) तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सोमवारी (ता. १५) जाहीर केली. यामध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणानिहाय ८ उपाध्यक्ष, ७ चिटणीस, ३ सरचिटणीस याशिवाय इतर पदाची निवडी पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात आल्यात. तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये तब्बल ६४ जेष्ठ आणि निष्ठावान नवतरुणांना स्थान देण्यात आले. या पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान आघाडीचे सुनील यादव उपस्थित होते.
नक्की वाचा : कोरठण खंडोबा येथे हरीनाम सप्ताहाचे आयोजन
कार्यकारिणीत निष्ठावान नवतरुणांना स्थान (karjat)
कर्जत तालुका भाजपाची विविध पदांच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष – युवराज शेळके (कोरेगाव), रमेश अनारसे (अळसुंदे), सुरेश मोढळे (देशमुखवाडी), प्रकाश शिंदे (चापडगाव), संतोष निंबाळकर (पाटेवाडी), संभाजी बोरुडे (कोकणगाव), सुनील काळे (करपडी), समीर जगताप (कुळधरण), तालुका सरचिटणीस – पप्पू धोदाड, राहुल निंबोरे, दत्तात्रय मुळे यांची तर चिटणीस म्हणून संतोष फरांडे, कल्याण नवले, सारंग घोडेस्वार, विष्णू गदादे, मंगेश थोरात, विठ्ठल अनभुले, प्रकाश पठारे यांची निवड करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक ; धडकेत एक जखमी
सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब पिसाळ तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपक गावडे यांची नियुक्ती (karjat)
यासह महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी प्रतिभा रेणूकर, शहराध्यक्ष आशा वाघ, कर्जत तालुका सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब पिसाळ तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपक गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्षपदी निळकंठ शेळके, कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, शिवाजी काळे (राशीन), संदीप बुद्धिवंत (मिरजगाव) तर ओबीसी कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून अजित अनारसे यांना स्थान देण्यात आले. तर पांडुरंग क्षीरसागर (ओबीसी सरचिटणीस), नंदलाल काळदाते (वैद्यकीय आघाडी), भाऊसाहेब गावडे, प्रशांत शिंदे (भटक्या विमुक्त आघाडी), गणेश जंजिरे, उदयसिंग परदेशी (किसान आघाडी), प्रवीण लोंढे (अनुसूचित जाती-जमाती), सुनील पोकळे (सांस्कृतिक आघाडी), अनिल खराडे (कामगार आघाडी), सुहास गावडे (दिव्यांग सेल), फारूक पठाण (अल्पसंख्याक आघाडी) यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.