Murder : संक्रांतीच्या दिवशी चिकनच्या दुकानात वाद; युवकाचा खून

Murder : नगर : मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सकाळी चिकनच्या दुकानावर आलेल्या दोन व्यक्तींत वाद झाला. या वादाचा राग मनात धरून दोन जणांनी एका युवकाचा खून (Murder) केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी (Police) गजाआड केले.

0
Murder
Murder

Murder : नगर : मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सकाळी चिकनच्या दुकानावर आलेल्या दोन व्यक्तींत वाद झाला. या वादाचा राग मनात धरून दोन जणांनी एका युवकाचा खून (Murder) केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी (Police) गजाआड केले. किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे (दोघे रा. दूध डेअरी चौक, शेंडी बाह्यवळण रस्ता, वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

Murder
Murder

छाती व पोटावर वार (Murder)

शुभम अशोक सोनवणे (वय २४, रा. फोर्जिंग कॉलनी, शेंडी बाह्यवळण रस्ता, वडगाव गुप्ता, ता. नगर) हा युवक सोमवारी (ता. १५) सकाळी शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील एका चिकनच्या टपरीजवळ गेला होता. त्यावेळी रोहित पाटोळे तेथे आला. त्यावेळी रोहित व शुभम यांच्यात चेष्टेत शिवीगाळ सुरू झाली. त्यातून शाब्दिक वाद झाला. रोहितने ही बाब घरी गेल्यावर त्याचा भाऊ किरणला सांगितली. त्यानुसार किरण व रोहितने शुभमला मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने शुभमच्या छाती व पोटावर वार केले. यात शुभमचा मृत्यू झाला.

आरोपींना अटक (Murder)

या संदर्भात शुभमचा भाऊ अनिकेत अशोक सोनवणे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला. तसेच आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारही पोलिसांनी हस्तगत केले आहे

नक्की वाचा : अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक ; धडकेत एक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here