Budget 2024 : बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून दिलासा; मोबाईल फोन स्वस्त होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचं हे अंतरिम बजेट सादर करतील. मात्र याआधीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण आता मोबाईल फोन स्वस्त होणार आहे.

0
Budget 2024
Budget 2024

नगर : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) आजपासून सुरू होत आहे. उद्या १ फेब्रुवारीला देशाच्या नवीन संसदेत २०२४ चा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचं हे अंतरिम बजेट सादर करतील. मात्र याआधीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण आता मोबाईल फोन (Mobile Phone) स्वस्त होणार आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात गारठा वाढणार; ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम 

मोबाईल फोन होणार स्वस्त (Budget 2024)

भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं आहे. मोबाईलच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क हे १५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांची घट करण्यात आली असून याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : साखर-डाळ वाटपावरून संजय राऊतांची टीका; भाजपकडून लाडू पाठवत प्रत्युत्तर  

महसूल विभागाकडून अधिसूचना जारी (Budget 2024)

अर्थमंत्रालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल आणि अन्य मेकॅनिकल पार्ट्सवर लागणारे आयात शुल्क आता पाच टक्के कमी असणार आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता भारतात कमी किंमतीमध्ये स्मार्टफोन तयार होणार आहेत. यामुळे ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here