Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटलांनी उगारलं पुन्हा आंदाेलनाचं हत्यार; १० फेब्रुवारीपासून उपाेषण

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटलांनी उगारलं पुन्हा आंदाेलनाचं हत्यार; १० फेब्रुवारीपासून उपाेषण

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून सगेसोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं. पुढील १५ दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारीत करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केली आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. जर पंधरा दिवसांत कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर मी येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण (Fasting to death) करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

हे देखील वाचा : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे (Manoj Jarange Patil)

जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, की सगेसोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी करायला पाहिजे. प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही हरकती-सूचना मागितल्या असल्या, तरी तातडीने अंमलबजावणी होणं आवश्यक आहे.”

Manoj Jarange Patil

सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या : डॉ. अमोल कोल्हे

ज्यांची नोंद मिळाली त्यांना प्रमाणपत्र वाटप होणं आवश्यक (Manoj Jarange Patil)

कुणबी नोंदी मिळत नाहीत म्हणून समितीला मुदतवाढ दिलेली असतानाही समिती काम करत नाही. ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांना प्रमाणपत्र वाटप होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण १० फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे, अशी घोषणा मी रायगडाच्या पायथ्याशी करत आहे. आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांवरील गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाहीत. सरकारकडून वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका आम्हाला कळत नाही. त्यामुळे १० फेब्रुवारीच्या आत गुन्हे मागे घ्यावे”, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here