Murder : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

Murder

0
Murder
Murder

Murder : श्रीगोंदा : तालुक्यातील कोथूळ येथे अज्ञात चार जणांनी घरात घुसून पत्नीला चाकूचा (Knife) धाक दाखवत पतीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत खून (Murder) केला. या घटनेत योगेश सुभाष शेळके (वय ३५) या तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.३०) पहाटे घडली.

हे देखील वाचा : गुन्हेगारांचे बळ वाढू नये, यासाठी पोलिसांना विशेष सूचना : राधाकृष्ण विखे पाटील

अज्ञात चार इसमाविरुद्ध गुन्हा दाखल (Murder)


या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरती योगेश शेळके (वय २६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी बेलवंडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हेशाखा सर्व बाजूने सखोल तपास करत आहे. याप्रकरणी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून इतर आरोपींच्या शोधत पोलीस पथके रवाना केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिली.

नक्की वाचा: काँग्रेसकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही : प्रफुल्ल पटेल

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी (Murder)

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी धाव घेत पाहणी करून पुढील तपास कामी सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here