Khas Re TV: ‘खास रे’ चे संजय कांबळे डिजिटल स्टार महागौरव पुरस्काराने सन्मानित

खास रे टिव्हीच्या संजय श्रीधर कांबळे यांना डिजिटल मीडिया पत्रकार आणि संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.

0
Khas Re Sanjay kamble

Khas Re TV : नगर : नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांमधून ‘खास रे’ टीव्ही प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करत असतो. याच खास रे टिव्हीच्या संजय श्रीधर कांबळे (Sanjay Kamble) यांना डिजिटल मीडिया पत्रकार आणि संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते डिजिटल स्टार महागौरव २०२४ हा पुरस्कार संजय कांबळे यांनी प्रदान करण्यात आला आहे.

नक्की वाचा : हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

पुरस्कारामुळे खास रे टिव्हीची जबाबदारी आणखी वाढली :संजय कांबळे (Khas Re TV)

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी, यांच्यासह राज्यभरातून आलेले मीडिया क्षेत्रातील हजारो सदस्य उपस्थित होते. सोहम ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रेरणेमुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे खास रे टिव्हीची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे संजय कांबळे यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट

खास रे टीव्हीचा स्वॅगच निराळा (Khas Re TV)

खास रे टीव्हीने २०२० मध्ये आलेल्या कोरोना लाटेत लोकांना जागरूक करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाने लसीकरण करावे यासाठी “लस घ्या” या गाण्याची संकल्पना मांडली होती. हे गाणं खूप व्हायरल झाले होते. ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी यांच्या जगण्याला समर्पित खास रे च्या  ‘ऊसाचा रस’ या गाण्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा स्वॅग आणि ऊसाचा रस हटके स्टाईलने जगभरात पोहचवला. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या “कष्ट घाम फुटेपर्यंत” ही वेबसिरीजही गाजली आहे. संजय कांबळे यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांना  यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चांगल्या कामाची पोचपावती म्हणून डिजिटल स्टार महागौरव २०२४ हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही पहा : हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here