Caste Validity Certificate : नगर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Certificate Verification) समितीच्यावतीने २६ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच सीईटी (CET) परीक्षा दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सहजतेने मिळावे, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा
प्रकरणे महाविद्यालयनिहाय संकलित केली जाणार
या मोहिमेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थी व डिप्लोमा अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या प्रवेशितांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक स्वरूपात संकलित केली जाणार आहेत. ही माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर गोळा करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई
विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे नियोजन (Caste Validity Certificate)
विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे नियोजन असून अर्जातील त्रुटींची दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनारमधून महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित प्रशासनास कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. २७ जून ते ३ जुलै २०२५ दरम्यान, जात पडताळणी समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत त्रुटी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच सीईटी परीक्षा दिलेले विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.