नगर : अनेक दिवसांपासून झारखंडमध्ये (Zarkhand) राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर ईडीने कारवाई केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या कारवाई नंतर येथील सरकार अस्थिर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांना बहुमत (Mejority) सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. अखेर आज झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी प्रस्तावावर मतदान झाले. झारखंड मुक्ती मोर्चाने ४७ मते मिळवत हा प्रस्ताव जिंकला तर बहुमत चाचणीच्या विरोधात केवळ २९ मते पडली.
नक्की वाचा : कर्नाटक सरकारने टॅक्सी सर्व्हिसचे भाडे केलं फिक्स
चंपई सोरेन यांची बहुमत चाचणी (Champai Soren)
चंपई सोरेन यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आज चंपई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. या परीक्षेत आता सोरेन सरकार पास झालं आहे.या फ्लोर टेस्टपूर्वी आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. अखेर काल (ता. ४) संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटसचा धोका देखील व्यक्त केला जात होता. मात्र यावेळी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालेलं नाही.
अवश्य वाचा : दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा ;बुमराह-अश्विनचा भेदक मारा
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा (Champai Soren)
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी ४१ सदस्यांचं संख्याबळ आवश्यक होतं. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४८ आमदाराचं पक्कं बहुमत होतं. यामध्ये JMM चे २९, काँग्रेसचे १७, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सरकारच्या बाजूने ४७ मते पडली आहेत.