IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा; बुमराह-अश्विनचा भेदक मारा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज (ता.५) सोमवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडला १०६ धावांनी पराभूत केले

0
IND Vs ENG
IND Vs ENG

नगर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Ind vs Eng) आज (ता.५) सोमवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडला १०६ धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah),आर अश्विन (R Ashwin), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांनी मोलाचे योगदान दिले.

नक्की वाचा : कर्नाटक सरकारने टॅक्सी सर्व्हिसचे भाडे केलं फिक्स

जसप्रीत बुमराह-अश्विनचा भेदक मारा (IND vs ENG)

भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत, इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या ३९९ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव २९२ धावांवर संपला. त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीच ही कसोटी आपल्या खिशात टाकली.

अवश्य वाचा : छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

इंग्लडची खेळी अपयशी (IND vs ENG)

इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी साकारली. यामध्ये ८ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्याशिवाय एकही इंग्लिश फलंदाज मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराह याने या कसोटीत ९ विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने ६ गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ३ गडी बाद करत बुमराहला चांगली साथ दिली.

हेही पहा : शाळाबाह्य २६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात दाखल

भारताने या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात टीम इंडियाने ३९६ धावा केल्या. यामध्ये सलामीचा फलंदाज यशस्वी जैयस्वाल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकवताना २०९ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २५३धावा केल्या. बुमराहने भेदक मारा करत सहा विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव २५५ धावांत आटोपला. इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले. मात्र, त्यांना हे आव्हान पेलवले नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यातील भारताने मात्र इंग्लडचा चांगलाच धुव्वा उडवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here