Cab Fare Fixed : कर्नाटक सरकारने टॅक्सी सर्व्हिसचे भाडे केलं फिक्स

कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उबेर आणि ओलासारख्या ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

0
Cab Fare Fixed
Cab Fare Fixed

Cab Fare Fixed : नगर : कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उबेर (Uber) आणि ओलासारख्या (Ola) ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. शहरातील वेगवेगळ्या टॅक्सी सेवांमध्ये जास्त पैसे आकारण्याच्या समस्या सोडवण्यासाठी एकसमान भाडे आकारण्याचा हा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.

नक्की वाचा : छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

वाहनांच्या किंमतीनुसार वाहनभाडे तीन श्रेणींमध्ये विभागले (Cab Fare Fixed)

राज्य परिवहन विभागाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहनांच्या किमतीनुसार हे भाडे विभागण्यात आले आहे. दरांमध्ये किमान भाडे आणि प्रति किलोमीटर अतिरिक्त शुल्क देण्यात आले आहे. वाहनांच्या किंमतीनुसार भाडे तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. १० लाखांपर्यंतच्या वाहनांचे किमान भाडे ४ किमीसाठी १०० रुपये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक जास्तीच्या किलोमीटरसाठी २४ रुपये आकारले जातील.

अवश्य वाचा : शाळाबाह्य २६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात दाखल

अधिसूचनेत सामान तसेच वेटिंग रेटबद्दल उल्लेख  (Cab Fare Fixed)

१० ते १५ लाख रुपये किंमतीच्या वाहनांसाठी,४ किमीसाठी किमान भाडे ११५ रुपये ठेवण्यात आले आहे आणि त्यापुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी २८ रुपये भाडे आकारले जाणार आहे. १५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी, ४ किमीसाठी किमान १३० रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतर पुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी ३२ रुपये भाडे आकारले जाईल. या अधिसूचनेत सामान तसेच वेटिंग रेट आणि रात्रीच्या प्रवासासाठी आकारली जाणारी जास्तीचे शुल्क याविषयी देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही पहा : ‘भक्षक’मध्ये सई ताम्हणकर साकारणार पोलिसाची भूमिका 

आता प्रवाशांना १२० किलोपर्यंत सामान मोफत नेता येणार आहे. त्यानंतर अतिरिक्त ३० ग्रॅम सामानासाठी ७ रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच पहिल्या ५ मिनिटांसाठी वेटिंग चार्ज नसेल, त्यानंतर प्रति मिनिटासाठी १ रुपये शुल्क आकारले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. सकाळी १२ ते सकाळी ६ दरम्यान चालणाऱ्या टॅक्सींना १० टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की प्रवाशांकडून जीएसटी टोल शुल्क वसूल केले जाऊ शकते,परंतु वेळेच्या आधारावर कोणतीही वसुली केली जाऊ शकत नाही.

हेही पहा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here