Chess tournament : नगरमध्ये रंगणार खुली बुद्धिबळ स्पर्धा; राज्यातून तीनशे खेळाडू येणार

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) तर्फे अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

0

नगर : नगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारी बडी साजन मंगल कार्यालयामध्ये १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) तर्फे अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

हे देखील वाचा : छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; छत्रपती संभाजीराजे यांचा हल्लाबोल

या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार आहे. आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू आदी राज्यातून तीनशेच्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. फिडे मास्टर अभिजित खेरडेकर सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

नक्की वाचा : घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

साडेपाच वर्षांचा सर्वात बाल खेळाडू तसेच ८३ वर्षांचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत, असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. रविवारी (ता. १९) सकाळी ११.३० वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत शेवटी गुरुवारी दुपारी नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना ५ पंच सुद्धा सहाय्य करणार आहेत. नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, श्याम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, प्रकाश गुजराती, नवनीत कोठारी आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धे विषयी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी यशवंत बापट यांच्याशी संपर्क साधावा.