Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर; प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नाही.

0
135

नगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली आहे. १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत ९६५ कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्यमंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सादरीकरणात देण्यात आली. त्याचबरोबर बैठकीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

हे देखील वाचा : छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; छत्रपती संभाजीराजे यांचा हल्लाबोल

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नाही. ९ जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्यस्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अमरावती अशा ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु आहे. पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांनी नोंदणी केली आहे. केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण ८ हजार १८ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार आहे. ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

नक्की वाचा : घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

राज्यात ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. रब्बीसाठी ५८ लाख ७६ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन आहे. आत्तापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी याच सुमारास १३ लाख ५० हेक्टर पेरणी झाली होती. यंदा १५ लाख ११ हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. १७ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या ४५ टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २१.५२ लाख हेक्टर आहे. यंदा ५.६४ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के पेरणी झाली आहे.