Ghanshyam Shelar : घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

0
136
Ghanshyam Shelar : घनश्याम शेलार यांच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंदा: पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येऊन अनिल वसंत सोमवंशी (रा. शिरसगाव बोडखा) याने बीआरएसचे (BRS) नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांच्या मुलाला घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच धक्काबुक्की करत तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रवीण शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अनिल वसंत सोमवंशी याला अटक केली.


याप्रकरणी दाखल माहितीनुसार शिरसगाव बोडखा येथील अनिल वसंत सोमवंशी याचे त्याच्या पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादात बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाने मध्यस्ती करत त्यांचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा राग येऊन आरोपी अनिल सोमवंशी याने १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेलार यांच्या वडळी येथील घरी दारु पिऊन जात शेलार यांना पती पत्नीच्या घरघुती वादात का मध्ये पडता असे म्हणून शिवीगाळ करत दमदाटी करुन धक्काबुक्की केली. तसेच तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.