Chhagan Bhujbal : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड

0
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : नगर :  मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे मंत्रीपद धाेक्यात आले आहे. भुजबळ यांनी ओबीसीं (OBC)साठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून (Cabinet) बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलीय. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान गायकवाड यांनी भुजबळांना दिले आहे.

नक्की वाचा: मनाेज जरांगे पाटलांनी उगारलं पुन्हा आंदाेलनाचं हत्यार; १० फेब्रुवारीपासून उपाेषण

Chhagan Bhujbal

राजकीय वर्तुळात चर्चा (Chhagan Bhujbal)

 मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. अशातच या वादाची ठिणगी आता मंत्रिमंडळात देखील पडली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत.  छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीची चर्चा होत असतानाच शिवसेनेच्या काही आमदारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ यांचे मंत्री पद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

हे देखील वाचा : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

राष्ट्रवादीनेही केले हात वर (Chhagan Bhujbal)

शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.  मराठा आरक्षणावरून मंत्री भुजबळांनी सरकारच्या विरोधातच आघाडी उघडली आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत सरकारच्या नव्या मसुद्यामुळं आरक्षणात नवे वाटेकरी तयार होतील, असा आक्षेप भुजबळांनी घेतलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत मंत्री छगन भुजबळ एकाकी पडत असल्याचेही चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनीही मराठा आरक्षणाचं समर्थन केले आहे.  मराठा आरक्षणाचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न महायुतीच्या काळात मार्गी लागल्याबद्दल तटकरेंनी समाधान व्यक्त केले. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून, पक्षाची नाही असं वक्तव्य करत प्रफुल्ल पटेल यांनी हात वर केले आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here