Lokshahi Trailer Out : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या 'लोकशाही'या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने राज्यात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा उत्साहात पार पडला आहे.

0
Lokshahi Trailer Out
Lokshahi Trailer Out

Lokshahi Trailer Out नगर : अभिनेत्री तेजश्री प्रधानच्यालोकशाही’ (Lokshahi) या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने राज्यात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा उत्साहात पार पडला आहे. लोकशाही चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर (Trailer Out) आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचे मन जिंकले आहे.

नक्की वाचा : अभिनेता सोनू सूदने पटकावला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार

‘लोकशाही’च्या ट्रेलरमध्ये काय आहे ? (Lokshahi Trailer Out)

घराणेशाहीत जगणाऱ्या लोकांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा अट्टाहास या ट्रेलरमधून दिसत आहे.या सत्तासंघर्षात कोणाचा तरी जीव जाणार आहे, मात्र कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

अवश्य वाचा : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या कारवर हल्ला  

‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट (Lokshahi Trailer Out)

‘लोकशाही’ या सिनेमात मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि अंकित मोहन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अमितरियान,सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संगीत दिग्दर्शक संजय राजी या जोडीमधील राजी यांनी ‘सख्या रे’ हे सुमधुर आणि जयदीप बागवडकर यांनी ‘ओ भाऊ’ हे उत्साही गाणं गाऊन सोहळ्यातील उपस्थितांची मने जिंकली. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही पहा :  भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या कारवर हल्ला  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here