Chhagan Bhujbal : नगर : राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये, असं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर नाभिक समाजाने आक्षेप नोंदवला आहे. भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज (nuclear society) आक्रमक झाला आहे, तसंच भुजबळांनी माफी मागावी, अन्यथा राज्यभरात निषेध (Prohibition) करू, असा इशाराही नाभिक समाजाकडून देण्यात आला आहे.
नक्की वाचा: कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध (Chhagan Bhujbal)
शनिवारी (ता. ३) नगरमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाबाबत वक्तव्य केले हाेते. नाभिक समाजाचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. ‘भुजबळ यांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे. कोणाच्या तरी स्क्रिप्टनुसार भाषणबाजी करू नये, अन्यथा त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल,” असा इशाराही सुरवसे यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड
नाभिक समाजाला आवाहन (Chhagan Bhujbal)
सुरवसे म्हणाले, ‘‘मी देखील ओबीसी समाजाचाच भाग आहे. ही लढाई लढत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींचा भाषणादरम्यान सन्मानपूर्वक उल्लेख करावा. कुणाचीही अस्मिता दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. न्हावी शब्दाऐवजी नाभिक असा उल्लेख भुजबळ यांनी करायला पाहिजे होता. तसंच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. सर्व जाती आणि धर्मातील लोकांची हजामत करून, सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रोजीरोटी कमावतात. त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांचे ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळा निर्माण करून घेऊ नये,” असं आवाहनही सुरवसे यांनी केलं आहे.