Sai Tamhnakar: ‘भक्षक’मध्ये सई ताम्हणकर साकारणार पोलिसाची भूमिका 

अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स वरच्या "भक्षक" मध्ये दिसणार आहे.

0
Sai Tamhnkar
Sai Tamhnkar

नगर : ‘श्री देवी प्रसन्न’ च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स वरच्या (Netflix) “भक्षक” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस (Police Officer) अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात दिसणार आहे. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आता हा नवा रोल सई कसा साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

नक्की वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट  

सई ताम्हणकर साकारणार महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका (Sai Tamhnakar)

भक्षकमध्ये भूमी सई ताम्हणकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार तर आहेच पण पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या बड्या कलाकारांसोबत ती ओटीटी वर दिसणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. भक्षकच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. आता ९ फेब्रुवारीला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

अवश्य वाचा : ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची घोषणा ; दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत  

रेड चिली एंटरटेनमेंटसोबत सईचा पहिला प्रोजेक्ट (Sai Tamhnakar)

सई पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंटसोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे. तिच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. वर्षभरात सई वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.मात्र  जस्मीत गौरला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

हेही पहा : ‘गोध्रा’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here