Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; छत्रपती संभाजीराजे यांचा हल्लाबोल

स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.

0

नगर : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जालना येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्यातच आता भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजेही (Sambhajiraje Chhatrapati) संतापले आहे. स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राज्य सरकार (State Govt) मधील मंत्र्यांच्या या भूमिकेशी राज्य सरकार सहमत आहे का, असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

अवश्य वाचा :  मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु  

छत्रपती संभाजीराजे म्हणाले
सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.

नक्की वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांची भविष्यवाणी

जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची भुजबळांनी काय गरज होती?
आरक्षण मुद्द्यावरून वदलेल्या वादावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर म्हणाले की आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो.

…आता ‘यांच्या’ छातील कळ नाही येत?; अंजली दमानिया
जालन्यातील भुजबळांच्या भाषणानंतर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उभं केलं आहे, असा आरोप केला आहे. आता तावातावाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत? जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे.” असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी म्हटलं आहे.