Christmas festival : नेवासा तालुक्यात नाताळ सण उत्साहात साजरा 

Christmas festival : नेवासा शहरासह तालुक्यात सोमवारी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सण मोठ्या भक्तीमय व जल्लोषाच्या वातावरणात साजरा केला. नेवासा शहरातील चर्चमध्ये नाताळ सणामुळे प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते.

0
christmas

नेवासा : शहरासह तालुक्यात सोमवारी ख्रिस्ती बांधवांनी (Christians) नाताळ सण मोठ्या भक्तीमय व जल्लोषाच्या वातावरणात साजरा केला. नेवासा शहरातील चर्चमध्ये (Church) नाताळ सणामुळे प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.२४) मध्यराञी चर्च समोर गव्हाणीमध्ये बाळ येशुचा (Jesus) देखावा तयार करण्यात आला होता. राञी बारा वाजता ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ‘मेरी ख्रिसमस’,’हॅपी ख्रिसमस म्हणत ख्रिस्ती बांधवांनी परस्परांना नाताळच्या शुभेच्छा दिल्यात.

नक्की वाचा : श्रीगोंदे बाजार समिती मधील बंद असलेली कांदा खरेदी सुरू  

 नेवासा शहरासह तालुक्यात ख्रिस्त बांधवांची संख्या मोठी उल्लेखनीय आहे. त्यामुळे तालुक्यातील कमी – अधिक प्रमाणात चर्चचे प्रमाणही मोठे आहे. नेवासा तालुक्यातील चर्चामध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला रविवारी राञी उपासना करण्यात आली. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत ख्रिस्ती बांधवांनी पवित्र नाताळ सणाचे यावेळी स्वागत केले. ख्रिस्त बांधवांचा पविञ सण असलेल्या नाताळ सणामुळे शहरासह तालुक्यातील चर्चवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करुन आकाशदिवे व पताक्यांनी चर्च सजलेले दिसून आले.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार; हवामान विभागाची माहिती

प्रभूयेशूचा जन्मदिवस साजरा करण्याचा उत्साह ख्रिस्त बांधवांमध्ये यावेळी दिसून आला. नाताळ सणामुळे बाजारपेठांमध्येही ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, होली रिट, प्रभूयेशू व मेरी यांच्या मूर्ती,चांदणी,खेळणी व सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली होती. विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध झालेल्या होत्या. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे अन्य धर्मीयांनीही ख्रिस्ती बांधवांना यावेळी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

ख्रिस्ती बांधवांनी मिठाई वाटप करुन नाताळ सणाचा आनंद यावेळी द्विगुणित करण्यात आला. रविवारी मध्यरात्री व सोमवारी ख्रिस्त जन्मानिमित्त चर्चमध्ये उपासना करण्यात आली. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने चर्चमध्ये प्रार्थनासभेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here