Civil Disobedience Movement : हिंदूंच्या धार्मिकस्थळावरील अतिक्रमणे हटवा; अन्यथा सविनय कायदेभंग चळवळ

0
223
Civil Disobedience Movement : हिंदूंच्या धार्मिकस्थळावरील अतिक्रमणे हटवा; अन्यथा सविनय कायदेभंग चळवळ
Civil Disobedience Movement : हिंदूंच्या धार्मिकस्थळावरील अतिक्रमणे हटवा; अन्यथा सविनय कायदेभंग चळवळ

Civil Disobedience Movement : राहुरी : हिंदूंच्या (Hindu) धार्मिकस्थळांवरील अतिक्रमणे राज्य सरकारने (State Govt) त्वरीत हटवावे. तसे न झाल्यास सविनय कायदेभंगाची चळवळ (Civil Disobedience Movement) हाती घ्यावी लागेल, असा इशारा महंत उद्धव महाराज मंडलीक यांनी दिला.

हे देखील वाचा: हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी


गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त, पुजारी यांना मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित निषेध मोर्चाचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रुपांतर झाले, यावेळी महंत उद्धव महाराज मंडलीक बोलत होते. मंडलिक महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायाने प्रसंगी कायदा मोडण्याची तयारी करावी लागेल. सविनय कायदेभंगाची चळवळ स्वातंत्र्य चळवळीतही होतीच. गुहा येथील कानिफनाथ ट्रस्टची जमीन हडपण्याचे कारस्थान आपण हाणून पाडू. वारकऱ्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्यांना गुन्हेगार बनवावे. आता असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार


आपण सर्व हिंदू एक हाच भाव भारतातील अनेक अतिक्रमीत मंदिरांचा वाद सोडवेल. कानिफनाथ मंदिर मूळ उतारा महाराष्ट्र शासन आहे. तेथे शेकडो वर्षांपासून सप्ताह, आरती, भजन चालते आहे. आळंदी व पंढरपूर कार्तिकी वारीत हे प्रश्न समोर ठेवू. गुहा ग्रामस्थां बरोबर आम्ही आहोत. एकत्र येवून लाखोंच्या संख्येने मोर्चा काढू. केवळ निषेध करुन चालणार नाही. हात धरुन सजा दिली पाहिजे. मानवता, उदारता सहन होत नसेल तर दंडीत केले पाहिजे. अतिक्रमणे हटवा. अन्यथा कायदा मोडू. जमीन हडपण्याचे कारस्थान हाणून पाडा, असे अजय मांजरे म्हणाले.


महंत अर्जुन महाराज तनपुरे म्हणाले, गुहा येथील मंदिर कानिफनाथाचेच आहे. त्याची चाळीस एकर जमीन आहे. ती बळकावण्यासाठी ट्रस्ट केला. आमचा त्यास विरोध आहे. रंगपंचमीला हिंदू पध्दतीने वार्षिकोत्सव होतो आहे.


किशोर महाराज जाधव म्हणाले, सर्वधर्मसमभाव हा आमचा स्थायीभाव आहे. आम्ही कोणावरही अन्याय करत नाही. आमच्या वर हल्ला करुन आम्हाला डिवचले आहे. नाठाळांच्या माथी काठी हाणू. हजारो वर्षाचा इतिहास आमच्या बाजूने आहे. वारकरी संप्रदाय कोणाच्या नादी लागत नाही. कानिफनाथची जमीन घशाखाली घालायची आहे. धर्मांतर विरोधी कायदा बनवला पाहिजे. आम्ही अतिक्रमणे करीत नाहीत. अतिक्रमण करतात त्यांना तुम्ही आमच्या ताब्यात द्या. आमच्या परंपरांची अवहेलना खपवून घेणार नाही.


यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वारकरी संप्रदायाचे वतीने निवेदन स्विकारले. किरण कोळसे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील व विविध संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. वायएमसीए मैदानापासून मोर्चा सुरू झाला. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here