Cleanliness : नगरमध्ये स्वच्छतेविषयी आगळी वेगळी स्पर्धा

0
Cleanliness : नगरमध्ये स्वच्छतेविषयी आगळी वेगळी स्पर्धा
Cleanliness : नगरमध्ये स्वच्छतेविषयी आगळी वेगळी स्पर्धा

Cleanliness : नगर : नगर शहरातील हॉटेलमध्ये स्वच्छता (Cleanliness) वाढावी, त्यातून नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला अधिक चालना मिळावी, नगरकरांचे आरोग्य चांगले रहावे, ग्राहकांत जागरूकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने नगर महापालिका, हायजिन फर्स्ट (Hygiene first)आय लव्ह नगरतर्फे (I love Nagar) आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे असे नाव देण्यात आले आहे.

नक्की वाचा : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली


नवीन वर्षारंभाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ही स्पर्धा होईल. नवीन वर्षा निमित्त स्वच्छतेचा नवा संकल्प रुजविण्यासाठी या स्पर्धेतून प्रयत्न होत आहे. हायजिन फर्स्ट ही संस्था नगर शहरात स्वच्छतेसाठी नेहमीच विविध उपक्रम हाती घेत असते. त्यांनी नगर महापालिका व आय लव्ह नगरच्या या उपक्रमात आपल्या समवेत घेत शहरात स्वच्छतेची नवी चळवळ हाती घेण्याचे ठरविले आहे.

हे देखील वाचा : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले


या स्पर्धेत शहरातील हॉटेलमध्ये एक क्युआर कोड लावला जाणार आहे. यात संबंधित हॉटेलमधील ग्राहकांनी स्वच्छताबाबत प्रतिक्रिया नोंदवायची आहे. या प्रतिक्रियेतून नगर शहरातील स्वच्छ हॉटेलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या भाग्यवान ग्राहक विजेत्याला आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहे. व्यावसायिक आणि ग्राहक यांचे सहकार्य अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – ९४२००२८२१२, ९८८१२४५१५५, ९६२३४५५५९९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here