Weather Update : महाराष्ट्रात गारठा वाढणार; ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम 

महाराष्ट्रात थंडीने मुक्काम वाढवला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस थंडी संपणार असा अंदाज होता. मात्र आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे.

0
Weather Update
Weather Update

नगर : महाराष्ट्रात थंडीने (Cold) आपला मुक्काम वाढवला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस थंडी संपणार असा अंदाज होता. मात्र आता फेब्रुवारीच्या (February) पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कालावधी वाढला आहे.

नक्की वाचा : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर  

राज्यात थंडीचा मुक्काम वाढला (Weather Update)

तापमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे हिवाळा जाणवत आहे. मात्र, हा थंडीचा मुक्काम जानेवारीच्या अखेरीस संपणार असा अंदाज असताना आणखी दहा दिवस तो वाढला आहे. सध्या दिवसा ऊन जाणवत असले तरीही सायंकाळपासून थंडीची चाहूल लागते. पहाटे थंडीत आणखी वाढ होते. विदर्भात मागील आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. तर आता ते १४ अंश सेल्सिअसच्या आतच आहे. कमाल तापमानात वाढ असली तरी किमान तापमानातील घट कायम आहे. उपराजधानीसह गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे.

अवश्य वाचा : राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम ८ फेब्रुवारीपर्यंत कायम (Weather Update)

राज्यात ३१ जानेवारीनंतर थंडीत आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम आठ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील. तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव देखील असणार आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर थंडीचा मुक्काम १५ फेब्रुवारीपर्यंत वाढू शकतो.

हेही पहा : शीना बोरा हत्याकांडावर डॉक्युमेंट्री सीरिज येणार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here